T20 World Cup : सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडशी भिडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India Warm-up T20 World Cup 2022

T20 World Cup : सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडशी भिडणार

Team India Warm-up T20 World Cup 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजवले आहे. ही स्पर्धा ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियात खेळवली जाणार आहे. आयसीसीने T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 16 संघांच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये टीम इंडियाला दोन सराव सामने खेळणार आहे. हे सराव सामने 10 ते 19 ऑक्टोबर दरम्यान खेळले जाणार आहेत. सर्व सामने मेलबर्न आणि ब्रिस्बेनमध्ये होणार आहे.

हेही वाचा: T20 World Cup : दुखापती टीम इंडिया जिंकणार का वर्ल्ड कप? 'या' खेळाडूंनी वाढवले टेन्शन

T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 16 संघांमध्ये 10 दिवसांत 15 सराव सामने खेळवले जातील. यादरम्यान भारतीय संघाला 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. तर दुसरा सराव सामना 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडकडून होणार आहे. दोन्ही सामने ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर होणार आहेत. आयसीसीने दोन फेऱ्यांमध्ये सराव सामने आयोजित केले आहेत. पहिल्या फेरीत सराव सामने खेळणारे संघ 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान सामने खेळतील. हे सामने मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि जंक्शन ओव्हल येथे होणार आहेत. तसेच थेट गट-12 साठी पात्र ठरलेल्या संघांना 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान ब्रिस्बेन येथे सराव सामने खेळाले जातील. सराव सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा असणार नाही.

हेही वाचा: IND vs AFG : अफगाणिस्तान विरुद्ध हे असेल Playing-11; या खेळाडूंना रोहित देणार संधी!

T20 विश्वचषक 2022 ची सुरूवात 16 ऑक्टोबर पासून होणार आहे, तर अंतिम सामना 13 नोव्हेंबरला खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून ऑस्ट्रेलियातील सात शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 2021 साली झालेल्या T20 विश्वचषकाचा आयोजक भारत होता, मात्र हा विश्वचषक UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

Web Title: India Face Australia New Zealand T20 World Cup 2022 Warm Up Matches Schedule Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..