भारतीय हॉकी संघांसमोर ऑलिंपिक स्पर्धेच्या गटसाखळीतच गतविजेत्यांचे आव्हान असेल
भारतीय हॉकी संघांसमोर ऑलिंपिक स्पर्धेच्या गटसाखळीतच गतविजेत्यांचे आव्हान असेल

भारतीय हॉकी संघांसमोर गतविजेत्यांचे आव्हान

मुंबई : टोक्‍यो ऑलिंपिक क्रीडा हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष तसेच महिला संघास गटसाखळीतच गतविजेत्यांचा सामना करावा लागणार आहे. पुरुष संघाचा समावेश असलेल्या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल असलेले ऑस्ट्रेलियाही आहेत.

रिओ ऑलिंपिकमध्ये धक्कादायक बाजी मारलेल्या अर्जेंटिनाविरुद्ध भारताचा सामना साखळीतच होईल. या ब गटात ऑस्ट्रेलिया, स्पेन, न्यूझीलंड आणि यजमान जपान आहेत. स्पर्धेच्या नव्या स्वरूपात अव्वल चार संघ बाद फेरीत प्रवेश करतात, त्यामुळे गटसाखळी पार करणे जागतिक क्रमवारीत पाचव्या असलेल्या भारतासमोर फारसे आव्हान नसेल अशी अपेक्षा आहे.

भारताचा महिला संघही अ गटात आहे. त्यांनाही गटात गतविजेते ब्रिटन त्याचबरोबर जागतिक महिला क्रमवारीत अव्वल असलेल्या नेदरलॅंडस्‌चे आव्हान असेल. या गटात जर्मनी, आयर्लंड तसेच दक्षिण आफ्रिका आहेत. आयर्लंड तसेच दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतीय महिला संघ गटाचा अडथळा पार करू शकेल. जागतिक क्रमवारीत नववा असलेल्या भारतीय महिला संघाने अमेरिकेचे कडवे आव्हान परतवत ऑलिंपिक पात्रता मिळवली.

ऑलिंपिक हॉकी स्पर्धेची गटवारी तयार करताना अर्थातच जागतिक क्रमवारी गृहीत धरण्यात आली. त्यानुसार पात्र संघाची विभागणी करण्यात आली. ही स्पर्धा खास ऑलिंपिकसाठी उभारलेल्या ओई हॉकी स्टेडियमवर 25 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान होणार आहे.

स्पर्धेची गटवारी
पुरुष, अ गट :
ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, भारत, स्पेन, न्यूझीलंड, जपान. ब गट : बेल्जियम, नेदरलॅंडस्‌, जर्मनी, ब्रिटन, कॅनडा, दक्षिण आफ्रिका.
महिला, अ गट : नेदरलॅंडस्‌, जर्मनी, ब्रिटन, आयर्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका. ब गट : ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, चीन, जपान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com