
AFC Asian Cup Qualifiers
sakal
पणजी: सुरुवातीच्या अर्ध्या तासाच्या खेळात वर्चस्व राखल्यानंतर भारतीय संघाने एकाग्रता गमावल्यामुळे एएफसी आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत सिंगापूरविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याची कबुली लढतीनंतर मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांनी दिली. गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेला सामना सिंगापूरने २-१ फरकाने जिंकला.