

Kho-Kho World Cup Details: भारतामध्ये पुढील वर्षी (२०२५) जानेवारी महिन्यात जागतिक खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. नव्या वर्षात पहिल्यांदाच खो-खो वर्ल्ड कप खेळवण्यात येणा आहे. ही स्पर्धा दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियमवर १३ ते १९ जानेवारी, २०२५ या कालावधीत होणार आहे.
या स्पर्धेसाठी खो-खो या खेळाच्या विकासाच्या दृष्टीने सहभागी संघांची संख्याही आता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पुरुष गटात १६ आणि महिला गटातही १६ संघ सहभागी होणार होते. पण आता ही संख्या वाढवण्यात आली असून पुरुष गटात २१ आणि महिला गटात २० संघ सहभागी होणार आहेत.