
Harmanpreet Singh, Manu Bhaker : पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखाली भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, त्याच्या नावाची मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय या पुरस्कारासाठी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी T64 गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रवीण कुमार ( Praveen Kumar ) याचेही नाव खेल रत्न पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही रामासुब्रमणियम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय निवड समितीने ही दोन नावं सुचवली आहेत.