Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

Hockey World Cup 2026: रतीय पुरुष हॉकी संघाला विश्वचषकात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. बेल्जियमविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाल्याने भारताला आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
Hockey

Hockey

esakal

Updated on

Hockey World Cup 2026: हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय पुरुष संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. बेल्जियमविरुद्धच्या सामन्यातही भारताला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या कामगिरीबद्दल हॉकी इंडियाचे अध्यक्ष आणि माजी भारतीय हॉकीपटू दिलीप तिर्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी बेल्फियस हॉकी एरिनामध्ये भारत आणि बेल्जियम यांच्यात ७व्या आणि ८व्या स्थानासाठी सामना झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमने भारताचा ४-३ असा पराभव केला. त्यामुळे भारताला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com