आशिया महिला फुटबॉलही नवी मुंबईत रंगण्याची चिन्हे

India to host AFC Womens Asian Cup in 2022
India to host AFC Womens Asian Cup in 2022

मुंबई : विश्‍वकरंडक 17 वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील अंतिम लढतीसाठी नवी मुंबईची निवड झाल्यानंतर आता आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीही नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. आशियाई महासंघाने 2022 च्या आशियाई महिला स्पर्धेचे यजमानपद भारतास देताना नवी मुंबईतील स्टेडियमचा आवर्जून उल्लेख केला.

भारतात नोव्हेंबरमध्ये विश्‍वकरंडक मुलींची फुटबॉल स्पर्धा आहे. आता 2022 च्या आशियाई महिला स्पर्धेचे यजमानपद भारतास लाभले. तैवान आणि उझबेकिस्तानला मागे सारत भारताने हे यजमानपद मिळवले आहे. या स्पर्धेतील लढतींसाठी भारतीय महासंघाने डी. वाय. पाटील स्टेडियम, ट्रान्सस्टेडिया एरिना (अहमदाबाद), फातोर्डा स्टेडियम (गोवा) या ठिकाणी लढती होतील, असे सुचवले आहे, असे आशियाई महासंघाने सांगितले.

भारतात 2016 मध्ये आशियाई 16 वर्षांखालील मुलांची स्पर्धा झाली होती; तर 2017 मध्ये विश्‍वकरंडक 17 वर्षांखालील स्पर्धा झाली होती. आता विश्‍वकरंडक 17 वर्षांखालील मुलींची स्पर्धा होत आहे. आता भारत आशियाई महिला स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेद्वारे भारतातील महिला फुटबॉलचा स्तर उंचावण्यास मदत होईल, असे आशियाई फुटबॉल महासंघाच्या महिला समितीचे प्रमुख माहफुझा अख्तर किरॉन यांनी सांगितले. या स्पर्धेपासून संघांची संख्या 8 वरून 12 होईल. स्पर्धेत तीन गट असतील आणि अव्वल आठ संघ स्पर्धा इतिहासात प्रथमच होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीस पात्र ठरतील. या स्पर्धेत आवश्‍यकतेनुसार प्ले ऑफ लढतीही होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com