
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी सुवर्ण दिवस ठरला आहे. भारताच्या खेळाडूंनी दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत वर्चस्व राखताना आत्तापर्यंत गुरुवारी ३ सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यामुळे आता भारताच्या खात्यात ५ सुवर्णपदकांचा समावेश झाला आहे.
बीडच्या अविनाश साबळेपाठोपाठ २५ वर्षीय ज्योती याराजीने नव्या विक्रमासह सुवर्णपदक जिंकले, तर भारताच्या महिला रिले संघानेही सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
गुरुवारी आधी अविनाश साबळेने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. त्यानंतर महिलांच्या १०० मीटर हर्डल प्रकारात ज्योती याराजीने सुवर्णपदक जिंकले. हे या स्पर्धेतील भारताचे चौथे सुवर्णपदक ठरले.