
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत धावपटू अविनाश साबळेने ऐतिहासिक कामगिरी बजावली. त्याने भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.