Asia Cup:आशिया चषकात भारताचा होणार अपेक्षाभंग, उर्वरीत ३ सामने रद्द होण्याच्या मार्गावर..जाणून घ्या कारण

६ दिवसांत भारत खेळणार ३ सामने, पावसामुळे सर्व सामने रद्द होण्याची शक्यता; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचणे अवघड.
Asia Cup:आशिया चषकात भारताचा होणार अपेक्षाभंग, उर्वरीत ३ सामने रद्द होण्याच्या मार्गावर..जाणून घ्या कारण

Asia Cup 2023:आशिया चषक भारतीय संघासाठी चांगला गेलेला नाही. भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये खेळला गेलेला सामना पावसाने खराब केला, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांमध्ये १-१ गुण विभागून देण्यात आले. नेपाळ विरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामन्यातील षटक कमी करण्यात आले. सुपर-४ मध्ये देखील भारतासाठी अशीचं परिस्थिती असणार आहे.

भारताच्या सुपर 4 सामन्यांना धोका

आशिया कपमध्ये भारतीय संघ उर्वरित तीन संघांसह सुपर 4 मध्ये खेळणार आहे. टीम इंडियाचा सामना पाकिस्तान, श्रीलंका आणि त्यानंतर बांगलादेशशी होणार आहे. भारताला हे तीन सामने 6 दिवसांत खेळायचे आहेत. हा सामना 10 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध, 12 सप्टेंबरला यजमान श्रीलंकेशी आणि त्यानंतर 15 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळला जाईल.

आशिया चषक सुपर 4 चे सामने कोलंबो, श्रीलंकेत होणार आहेत जिथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारताच्या सामन्यांमध्ये पावसाबद्दल बोलायचे झाले तर भारत-पाकिस्तान सामन्यात 80 ते 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Latest Marathi news)

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ६० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारताचे सामने असेच पावसामुळे रद्द झाले तर गुणतालिकेत विपरित परिणाम होतील. प्रत्येक सामन्यात 1-1 गुणांची वाटणी झाली, तर अंतिम फेरीत स्थान मिळवणे कठीण होईल.

Asia Cup:आशिया चषकात भारताचा होणार अपेक्षाभंग, उर्वरीत ३ सामने रद्द होण्याच्या मार्गावर..जाणून घ्या कारण
INDIA: 'इंडिया आणि भारत'मधील फरक सांगणारा लालूंचा जूना VIDEO; सोशल मीडियावर होतोय व्हायरल

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई चषक सुपर 4 सामना सुरू झाला आहे. पाकिस्तानने पहिला सामना बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर खेळला. उर्वरित सुपर 4 चे सामने श्रीलंकेत होणार आहेत.

या सामन्याबद्दल बरीच चर्चा झाली पण शेवटी आशियाई क्रिकेट परिषदेने कोलंबो किंवा हम्बनटोटाला यजमान न देण्याचा निर्णय घेतला. सामने खेळवण्याच्या शर्यतीत हम्बनटोटा आणि दांबुला हे स्टेडियम आघाडीवर होते, पण आता तेथील सामने दुसरीकडे हलवण्यात येणार आहेत.(Latest Marathi news)

Asia Cup:आशिया चषकात भारताचा होणार अपेक्षाभंग, उर्वरीत ३ सामने रद्द होण्याच्या मार्गावर..जाणून घ्या कारण
Manuscript in G20:ऋग्वेदातील हस्तलिखितांचा प्राचीन वारसा नेमका कोठे ठेवलाय? जी-२० परिषदेत वाढवणार भारताची शान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com