
सलामीच्या लढतीत ताजिकिस्तानला पराभूत करणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाला सोमवारी झालेल्या नेशन्स फुटबॉल करंडकातील ब गटातील साखळी फेरीच्या लढतीत इराणकडून ३-० अशी हार पत्करावी लागली. पूर्वार्धात कडवी झुंज देणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाकडून उत्तरार्धात अनुभवाची कमतरता प्रकर्षाने दिसून आली.
फिफा क्रमवारीत २०व्या स्थानावर असलेल्या इराणने १३३व्या स्थानावर असलेल्या भारतीय फुटबॉल संघाला पराभूत करीत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल उचलले.