IND vs WI: विंडीजला शेवटच्या षटकात 10 धावांची होती गरज, आवेश खानने पहिलाच चेंडू...

शेवटच्या षटकात रोहितच्या एका चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पराभव
IND vs WI
IND vs WIsakal
Updated on

India vs West Indies 2nd T20I : भारताला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या जवळ होता, पण शेवटच्या षटकात रोहितच्या एका चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पराभव झाला.

पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिले तीन सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. तर शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत. या मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना 68 धावांनी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र आता दुसरा सामना गमावल्यानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

IND vs WI
WI vs IND : किंग्जची झुंजार खेळी थॉमसने नेली तडीस; आवेशचा एक नो बॉल पडला महागात

वेस्ट इंडिजला दुसऱ्या सामन्यात 139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात विजयासाठी 10 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माने हे षटक वेगवान गोलंदाज आवेश खानला दिले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आवेशने अशी चूक केली, ज्यामुळे सामना भारताने गमावला. आवेशने पहिला चेंडू नो-बॉल केला. यानंतर स्ट्राईकवर आलेल्या डेव्हॉन थॉमसने पुढच्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला.

IND vs WI
Commonwealth Games 2022 : महिला हॉकीचे उपांत्य फेरीचे लक्ष्य

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 19.4 षटकांत सर्वबाद 138 धावांवर आटोपला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 31 आणि रवींद्र जडेजाने 27 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयने 4 षटकात 17 धावा देत 6 बळी घेतले. प्रत्युत्तरात विंडीज संघाने 5 विकेट्सवर 145 धावा करत सामना जिंकला. सलामीवीर ब्रेंडन किंगने सर्वाधिक 68 धावांची खेळी खेळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com