
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या चकचकीत प्रकाशात आणि जल्लोषाच्या गजरात भारतीय पुरुष आणि महिला संघाने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला!
नेपाळला अंतिम सामन्यात पराभूत करत दोन्ही भारतीय संघाने संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला व भारतीय पुरुष आणि महिला संघाने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर भारताचे नाव विश्वचषकावर सुवर्ण अक्षरात कोरले. दान्ही भारतीय खो-खो संघाने एक अनोखा आणि गौरवास्पद इतिहास रचला आहे.