
रविवारी भारतीय महिला संघाने पहिल्या वहिल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद पटकावले. भारतीय महिलांच्या पोठापाठ रविवारी भारताच्या पुरुष संघानेही खो-खो वर्ल्ड कपवर नाव कोरले. अंतिम सामन्यात भारतीय पुरुष संघाने ५४-३६ गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
भारताने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. भारताने नेपाळला या स्पर्धेत दुसऱ्यांदा पराभूत केले. साखळी फेरीतही भारताने नेपाळवर विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने चारही टर्नमध्ये वर्चस्व गाजवले.