
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा विविध पराक्रम मैदानात करताना दिसत असतो. गेलं वर्ष त्याच्यासाठी चढ-उतारांचं राहिलं असलं तरी या वर्षात त्याने सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी केली आहे. यंदा त्याने पहिल्यांदात ९० मीटरचं अंतरही पार केलं.
आता नीरजने पुन्हा एकदा भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याने तब्बल ९ महिन्यांनंतर हे अव्वल क्रमांकाचे सिंहासन पटकावले आहे.