IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया

स्टार खेळाडूला संघात पुन्हा स्थान मिळण्याची चर्चा | Virat Rohit Dhawan Comeback
Team-India
Team-India
Summary

स्टार खेळाडूला संघात पुन्हा स्थान मिळण्याची चर्चा

India vs South Africa : भारतीय संघाची सध्या न्यूझीलंड विरूद्ध कसोटी मालिका सुरू आहे. ७ डिसेंबरला ही मालिका संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पण जगाला लॉकडाउनचा फटका देणाऱ्या कोरोनाने पुन्हा एकदा क्रिकेटला ब्रेक लागण्याची भिती निर्माण झाली आहे. दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा एक नवा वेरिएंट आढळला आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये भारतीय संघाचा नियोजित दक्षिण आफ्रिका कार्यक्रम काहीसा संकटात असल्याची चिन्हं आहेत. हा दौरा जर नक्की झाला तर भारतीय संघात काही स्टार खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Team-India
IND vs NZ: वासिम जाफरने स्वत:लाच केलं ट्रोल; जाणून घ्या कारण

न्यूझीलंडच्या संघाशी दुसरी कसोटी खेळून झाल्यावर २४ तासात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निघणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर १० सामने खेळणार आहे. ३ कसोटी, ४ वन डे आणि ३ टी२० सामन्यांचा यात समावेश असणार आहे. त्यामुळे भला मोठा संघ घेऊन भारत या दौऱ्यावर जाईल अशी शक्यता आहे. निवड समितीकडून लवकरच संघाची घोषणा होईल. या संघात अनेक खेळाडूंचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

Team-India
IND vs NZ: झकास बॅटिंग करूनही श्रेयसला लागत नव्हती झोप, कारण...

या स्टार खेळाडूंचं होणार 'कमबॅक'?

भारतीय वन डे संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली या मालिकेसाठी पुनरागमन करेल. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलदेखील संघात असतील. त्यांच्यासोबत स्टार सलामीवीर शिखर धवनला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मधल्या फळीत अनेक खेळाडू संघात आहेत. मात्र, हार्दिक पांड्याला पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, बुमराह, भुवनेश्वर आणि शमीसोबत दीपक चहर किंवा हर्षल पटेल पैकी एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे.

Team-India
IND vs NZ : सलामी जोडी फोडणार कोण? किवींसमोर गोलंदाजांनी टाकली 'मान'

दक्षिण आफ्रिका वनडेसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर/हर्षल पटेल, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, आर अश्विन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com