Wasim Jaffer Troll | IND vs NZ: वासिम जाफरने स्वत:लाच केलं ट्रोल; जाणून घ्या कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas-Iyer-Wasim-Jaffer

श्रेयस अय्यरच्या शतकानंतर ट्विट केला मजेदार फोटो

IND vs NZ: वासिम जाफरने स्वत:लाच केलं ट्रोल; जाणून घ्या कारण

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ, 1st Test : भारताचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर याने दुखापतीतून सावरून दमदार पुनरागमन केले. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने अप्रतिम शतक (१०५) ठोकलं. त्याला शुबमन गिल (५०) व रविंद्र जाडेजा (५०) यांच्याकडून मिळालेल्या साथीच्या बळावर भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. मुंबईकर श्रेयस हा पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा १६वा भारतीय फलंदाज ठरला. श्रेयस अय्यरने १७१ चेंडूत १०५ धावांची खेळी केली. त्यात १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्या दमदार खेळीनंतर भारताचा रणजी किंग वासिम जाफर याने स्वत:लाच ट्रोल केलं.

हेही वाचा: "श्रेयस, तू ३०० रन्स केल्यास तरी तुला संघातून बाहेरच काढणार"

वासिम जाफरने मुंबईच्या रणजी संघात समृद्ध अशी कारकिर्द घडवली. पण भारतीय कसोटी संघात त्याला फारशी संधी मिळू शकली नाही. जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याला हवा तसा प्रभाव पाडता आला नाही. सोशल मिडियावर तो इतरांना ट्रोल करण्यात आणि मजेशीर रिप्लाय देण्यात आघाडीवर असतो. पण आज श्रेयस अय्यरने शतक ठोकल्यानंतर त्याने स्वत:लाच ट्रोल करून घेतलं. 'मै हूँ ना' या बॉलिवूड चित्रपटातील अतिशय लोकप्रिय असलेलं एक धमाल मीम त्याने पोस्ट केले. मुंबईचे सगळेच फलंदाज कसोटी पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकतात, असं पहिलं वाक्य होतं. त्यावर, सगळेच शतक करत नाहीत, असा रिप्लाय त्याला मिळतो.

पाहा, वासिम जाफरचं मजेशीर ट्वीट-

हेही वाचा: पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा श्रेयस १६वा भारतीय.. पाहा यादी

दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या डावात ३४५ धावा केल्यानंतर न्यूझीलंडच्या सलामीवीरांनीही चमक दाखवून दिली. चहापानाच्या विश्रांतीपर्यंत त्यांनी अर्धशतकी सलामी देत संयमी खेळी केली.

loading image
go to top