India vs New Zealand | Video: खुन्नसची जुगलबंदी... पाहा, नक्की कोण जिंकलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak-Chahar-Martin-Guptill

वाचा, नक्की असं घडलं तरी काय?

Video: खुन्नसची जुगलबंदी... पाहा, नक्की कोण जिंकलं?

IND vs NZ 1st T20 : भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते न्यूझीलंडला पराभूत केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. गप्टीलच्या ७० आणि चॅपमनच्या ६३ धावांच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. यास प्रत्युत्तर देताना सूर्यकुमार यादवच्या ६२ आणि रोहितच्या ४८ धावांच्या खेळीमुळे भारताना सामना जिंकला. या सामन्यात दीपक चहर आणि मार्टीन गप्टील यांच्यामधला एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: IND vs NZ: रोहित-राहुल जोडीचा धमाका; केला धडाकेबाज विक्रम

जयपूरच्या स्टेडियमवर रंगलेल्या टी२० सामन्यात मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमॅन जोडीने न्यूझीलंडला दमदार सुरुवात मिळवून दिली. भुवनेश्वर कुमारने डॅरेल मिशेलला शून्यावर बाद केले पण त्यानंतर गप्टिल आणि चॅपमॅन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून अनुभवी मार्टीन गप्टीलनेही चांगली खेळी केली. ४२ चेंडूत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार खेचत ७० धावांची खेळी केली. वेगवान गोलंदाज दीपक चहरला षटकार खेचल्यानंतर गप्टीलने त्याला एक नजर दिली होती. पण त्यानंतर गप्टीलला बाद केल्यानंतर दीपक चहरने त्याला जोरदार खुन्नस दिली.

हेही वाचा: IND vs NZ: राहुलने एक चौकार अन् एक षटकार लगावत रचला पराक्रम

खुन्नसची जुगलबंदी (Video)

दरम्यान, भारताच्या संघाकडून १६५ धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने ४८ धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांच्या साथीने धावा जमवल्या. पण सूर्यकुमारने दमदार खेळ केला. त्याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिले.

loading image
go to top