तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका; विंडीजविरुद्ध सूर्यकुमारची परीक्षा, इशान, सॅमसनवरही लक्ष

सूर्यकुमार यादव तसेच संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यासाठी ही मालिका स्वतःला सिद्ध करण्यासाठी असणार
suryakumar yadav
suryakumar yadavsakal
Updated on

ब्रिजटाऊन : भारतासाठी वर्ल्डकपची तयारी; तर प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिजसाठी केवळ एक मालिका एवढेच महत्त्व असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका उद्यापासून सुरू होत आहे. सूर्यकुमार यादव तसेच संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यासाठी ही मालिका स्वतःला सिद्ध करण्यासाठी असणार आहे.

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजचा संघ अपात्र ठरला आहे. त्यामुळे जेथे आता इतर संघ स्पर्धेच्या तयारीत गुंततील, तेथे वेस्ट इंडिजचा संघ नव्या सुरुवातीसाठी प्रयत्न करेल. भारतासाठी मात्र येथून पुढे प्रत्येक सामना हा तयारीचा असेल आणि त्यातून काही खेळाडूंची परीक्षाही होईल.

suryakumar yadav
Cheteshwar Pujara Suryakumar Yadav : सूर्याला कसोटी काही झेपेना... पुजाराही गेला फेल; 'पश्चिम'ची तगडी फलंदाजी झाली ढेर

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर तंदुरुस्तीच्या मार्गावर आहेत. लवकरच ते संघात असतील. त्यामुळे मधल्या फळीसाठी सध्या रिकाम्या असलेल्या जागा सूर्यकुमारला निश्चित करावी लागणार आहे.

टी-२० प्रकारात `३६० डिग्री` फलंदाज अशी ओळख निर्माण करणाऱ्या सूर्यकुमारला एकदिवसीय प्रकारात मात्र ठसा उमटवता आलेला नाही. त्याला वारंवार संधीही देण्यात आली होती. आता आशिया करंडक स्पर्धा तोंडावर आलेली असताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील हे तीन सामने सूर्यकुमारसाठी अंतिम परीक्षेसारखे असणार आहेत.

suryakumar yadav
Share Market Opening : ग्रीन मार्कमध्ये उघडला शेअर बाजार; सेन्सेक्स-निफ्टी दोन्हींमध्ये तेजी

नजीकच्या काळात वर्ल्डकपसाठी संघ निवड होऊ शकेल. त्यासाठी आत्तापासून निवड समितीचे विचार सुरू झाले आहेत, बहुतांश खेळाडू निश्चित असले, तरी काही जागांसाठी चुरस आहे. सूर्यकुमारसह इशान किशन-सॅमसन (यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल आणि उम्रान मलिक यांना आता प्रभाव पाडावा लागणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर वेस्ट इंडिजमध्ये असून ते जातीने लक्ष देणार आहेत.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीला खेळणार, हे निश्चित असल्यामुळे ऋतुराजला पुन्हा एकदा संधीची वाट पाहावी लागेल. उपकर्णधार हार्दिक पंड्या आयपीएलनंतर प्रथमच खेळणार आहे. त्यामुळे प्रदीर्घ विश्रांतीनंतर तो संघातील इतर सर्व खेळाडूंपेक्षा अधिक ताजातवाना असेल. त्यामुळे त्याच्याकडून गोलंदाजीचीही अपेक्षा असेल.

suryakumar yadav
Japan Open 2023 : सिंधू, प्रणोय आतातरी अपयशातून बाहेर येणार?

संघ यातून निवडणार

शेय होप (कर्णधार), रोमवान पॉवेल, अलिक अथानाझे, यान्निक कॅरिया, केसी कार्टी, डॉमनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, केली मेयर्स, गुदाकेश मोटी, जेडेन सीलस्, रोमारिओ शेफर्ड, सिन्केअर, ओशाने थॉमस.

भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक आणि मुकेश कुमार.

उम्रान मलिकवर लक्ष

महम्मद शमी संघात नसल्यामुळे या मालिकेसाठी उम्रान मलिकला अंतिम संघात स्थान मिळू शकेल. त्याच्याकडे इतर गोलंदाजांपेक्षा अधिक वेग असला, तरी तो धावा अधिक देत आहे. तो आत्तापर्यंत सात एकदिवसीय सामने खेळलेला असून १३ विकेट मिळवता आल्या आहेत. उम्रानसह जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमारही शर्यतीत असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.