पहिल्या दिवशी फलंदाज चमकले; भारताकडे वर्चस्वाची संधी

बुधवार, 26 डिसेंबर 2018

तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टिच्चून खेळ करत भारतीय फलंदाजांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या 2 बाद  215 चा धावफलक आशा वाढवणारा आहे.

मेलबर्न : तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टिच्चून खेळ करत भारतीय फलंदाजांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या 2 बाद  215 चा धावफलक आशा वाढवणारा आहे. मयांक आगरवालने पदार्पणातच अर्धशतक झळकाविले. ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण करताना अर्धशतक करणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.  चेतेश्वर पुजारा 68 धावा आणि विराट कोहली 47 धावा काढून नाबाद परतले.

सवाई गंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मांडवात मांडी ठोकून दर्जेदार शास्त्रीय संगीत ऐकणे आणि 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर येऊन बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा आनंद घेणे हा समान अनुभव मानता येईल. भारावलेल्या वातावरणात क्रिकेटचा आनंद घेण्याकरता 73 हजारापेक्षा जास्त प्रेक्षक मेलबर्न क्रिकेट मैदानावर हजर झाले ज्यांना मयंक आगरवालचे (76 धावा) आश्वासक पदार्पण बघायला मिळाले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : 

INDvsAUS : पहिल्याच दिवशी भारत 'फ्रंटफूट'वर; मयांक आणि पुजारा चमकले!

Web Title: India scores 215 on day one of 3rd test