दुसऱ्या सराव सामन्यात पंतच्या कामगिरीवर लक्ष

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई- अजिंक्‍य रहाणे आणि सुरेश रैना यांचे पुनरागमन होत असताना लक्ष मात्र नवोदित रिषभ पंतच्या कामगिरीवर असणार आहे. भारत "अ' आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सराव सामन्यात निकालापेक्षा भारतीय संघातील खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर निवड समितीचे लक्ष असेल.

एकदिवसीय संघातील धोनीचा वारसदार म्हणून दिल्लीच्या पंतकडे पाहिले जात आहे. त्यासाठीच इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे; परंतु सराव सामन्यातही संधी देऊन निवड समितीने व्यापक धोरण स्वीकारले आहे.

गत ज्युनिअर विश्‍वकरंडक स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघात पंतचा समावेश होता. त्या स्पर्धेतून त्याने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली होती; तसेच यंदाच्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्ध त्याने 308 धावांचीही खेळी केली होती. त्यामध्ये 42 चौकार आणि 9 षटकारांची आक्रमकता त्याने दाखवली होती.

एकीकडे पंतच्या कामगिरीवर लक्ष असताना, झारखंडचा यष्टीरक्षक फलंदाज आणि 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेतील पंतचा सहकारी असलेला इशान किशनच्या कामगिरीवरही लक्ष ठेवले जाईल.
या सराव सामन्याच्या माध्यमातून रहाणे आणि रैना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. रहाणेला टी-20 संघातून, तर रैनाला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे फॉर्म मिळवण्यासाठी आणि उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी या दोघांसमोर ही चांगली संधी असेल.
काल झालेल्या पहिल्या सराव सामन्यात धोनी, युवराज, शिखर धवन आणि आशिष नेहरा अशा वरिष्ठ खेळाडूंना संधी दिल्यानंतर उद्या होणाऱ्या सामन्यासाठी नवोदितांवर भर देण्यात आला आहे. विजय शंकर, परवेझ रसुल, दीपक हुडा, शेल्डन जॅक्‍सन, शाहबाझ नदीम यांची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडच्या अनुभवी संघासमोर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची या नवोदितांना चांगली संधी असेल.

Web Title: India a team practice mathch against England