India Ready for Test Series vs South Africa
esakal
व्हाइट बॉलमधून रेड बॉल अर्थात कसोटी सामन्यासाठी परिवर्तन सुलभ करण्यासाठी कर्णधार शुभमन गिलसह काही प्रमुख खेळाडूंनी घाम गाळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ही तयारी आजपासून सुरू झाली. तेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली भारतात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी विजेता आहे. त्यातच त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानमध्ये मालिका १-१ बरोबरीत सोडवलेली आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीयाचा कस पणास लागणार आहे.