India May Return to Specialist Test Batsmen
esakal
दक्षिण आफ्रिकेविरुद्धही व्हाईटवॉश स्वीकारण्याची नामुष्की ओढावल्यानंतर भारतीय कसोटी संघात पुन्हा एकदा स्पेशालिस्ट खेळाडूंचे महत्त्व वाढू शकते. अजित आगरकर यांच्या निवड समिती महत्त्वाच्या क्रमांकाबाबत प्रामुख्याने तिसऱ्या क्रमांकासाठी खेळाडू निवडताना आपला दृष्टिकोन बदलू शकते. गेल्या तीन दशकांतील मोठा काळ राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारासारख्या दिग्गजांनी भक्कमपणे तिसरा क्रमांक सांभाळला होता; परंतु आता हा क्रमांक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, त्यासाठी स्पेशालिस्ट फलंदाजांची निवड होऊ शकते.