esakal | ENG vs IND : कसोटी मालिकेपूर्वी विराट-अजिंक्य दुखापतग्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli And Ajinkya Rahane

ENG vs IND : कसोटी मालिकेपूर्वी विराट-अजिंक्य दुखापतग्रस्त

sakal_logo
By
सुशांत जाधव

County Select XI vs Indians: इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि काउंटी सिलेक्ट इलेव्हन यांच्यात सराव सामना खेळवण्यात येत आहे. मंगळवारी सुरु झालेल्या प्रथम श्रेणी सामन्यात भारतीय संघ नियमित कर्णधार विराट कोहली (Virat KOhli) आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्याशिवायच मैदानात उतरला. काउंटी एकादश (County Select XI) विरुद्धच्या सामन्यात किरकोळ दुखापतीमुळे त्यांना विश्रांती देण्यात आलीये. (India Tour Of England BCCI says Virat Kohli And Ajinkya Rahane ruled out of County XI match due to injuries)

या दोघांशिवाय राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत असलेला गोलंदाज आवेश खान यांच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. हनुमा विहारीचा फटका अडवताना त्याला ही दुखापत झालीये. मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासोबतच विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला विश्रांती देण्यात आल्याची माहिती बीसीसीआने दिलीये.

हेही वाचा: UAE ला जाण्यापूर्वी धोनीचा संघ चेपॉकमध्ये ठोकणार तंबू

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी प्रसारमाध्यमांना निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिलीये. सोमवारी सायंकाळपासून विराट कोहलीच्या पाठिला त्रास जाणवत आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला सराव सामन्यातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. उप कर्णधार अजिंक्य रहाणेच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला असून पायाला हलकी सूज आहे. त्याच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले आहेत.

हेही वाचा: गोल्डन गर्ल राहीच्या यशस्वी प्रवासाची कहाणी;पाहा व्हिडिओ

अजिंक्य रहाणे बीसीसीआय मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली असून तो इंग्लंड विरुद्ध 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल, अशी आशाही निवेदनातून व्यक्त करण्यात आलीये.

loading image