esakal | SL vs Ind : स्वप्न सत्यात उतरल्याचे पाहायला बाबा हवे होते; चेतनची भावूक प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Sakarya

SL vs Ind : "स्वप्न सत्यात उतरल्याचे पाहायला बाबा हवे होते"

sakal_logo
By
सुशांत जाधव

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या स्वतंत्र्य संघात नवोदित खेळाडूंचा भरणा असल्याचे पाहायला मिळले. पहिल्यांदाच एखाद्या परदेशी दौऱ्यासाठी मोठ्या संख्येने नवोदित खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. यातील एक नाव म्हणजे आयपीएलमध्ये लक्षवेधी ठरलेला चेतन सकारिया. टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या संघातील जलदगती गोलंदाज चेतन सकारिया भावूक झालाय. राष्ट्रीय संघात निवड झाल्याचे पाहण्यासाठी वडील असायला हवे होते, अशी भावूक प्रतिक्रिया त्याने दिलीये. (India Tour Of Sri Lanka Chetan Sakariya Miss His Father After Getting Place In Team India Squad)

प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये चेतन सकारिया म्हणाला की, हे सर्व पाहण्यासाठी माझे बाबा असायला हवे होते, असे वाटते. मी टीम इंडियाकडून खेळावे, असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. पण टीम इंडियात स्थान मिळाल्याचे पाहायला ते आपल्यात नाहीत. या क्षणी त्यांची आठवण येत आहे. वर्षभरात चढ उताराचा सामना करावा लागला, असेही तो यावेळी म्हणाला.

हेही वाचा: EURO 2020 : इटली भारी; पण तुर्कीचीही कहाणी न्यारीच!

तो म्हणाला की, भावाला गमावल्याच्या दु:खात असताना आयपीएलचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. मागील महिन्यात मी वडिलांनाही गमावले. आता मला टीम इंडियात स्थान मिळाले. वडील मृत्यूशी झुंज देत असताना 7 दिवस रुग्णालयात होतो. या परिस्थितीतही आई आणि वडिलांनी क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली. वडिलांची उणीव सतत भेडसावत राहिल, अशी भावूक प्रतिक्रिया सकारियाने दिली.

हेही वाचा: SL vs IND आतापर्यंत जे घडलं नाही ते द्रविड करुन दाखवणार

चेतन सकारियाच्या वडिलांचे 9 मे रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. ते टेम्पो ड्रायव्हिंगचे काम करायचे. मेहनत करुन त्यांनी आपल्या लेकाला क्रिकेटर बनवले. लेकाने राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व करावे, असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. पण आज तो क्षण पाहण्यासाठी ते आपल्यात नाहीत. सकारियाने आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व केले होते. 7 सामन्यात 8.22 च्या इकोनॉमी रेटने त्याने 7 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या विकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या विकेटचाही समावेश आहे.