Rohit Sharma : टीम इंडिया सहज जिंकली, मग रोहित शर्माला चिंता कशाची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

Rohit Sharma : टीम इंडिया सहज जिंकली, मग रोहित शर्माला चिंता कशाची?

Rohit Sharma India vs South Africa 1st T20i : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर हा सामना काल खेळल्या गेला. भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून पराभव केला.

सूर्यकुमार यादवने भारतासाठी 50 धावांचे शानदार अर्धशतक झळकावले, त्याने आपल्या डावात 5 चौकार आणि 3 षटकार मारले. सूर्या व्यतिरिक्त केएल राहुलने देखील 51 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळी खेळली. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कोणता होता हे सांगितले.

हेही वाचा: Suryakumar Yadav : 'सिक्सर किंग' सूर्यावर विक्रमांचा पाऊस; पाकिस्तानी खेळाडूला टाकले मागे

पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने पराभव केल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, आजची विकेट अवघड होती. खेळपट्टीवरील गवत पाहून आम्हाला माहित होते की येथे गोलंदाजांना मदत होईल परंतु संपूर्ण 20 षटके त्यांना मदत करेल अशी अपेक्षा नव्हती. दोन्ही संघ अजूनही स्पर्धेत आहेत, जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल. आमची सुरुवात चांगली झाली होती. सामन्याच्या सुरुवातीला झटपट पाच विकेट्स हा आजच्या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. वेगवान गोलंदाजाला मदत मिळाल्यावर कसा गोलंदाजी केली जाते याचे या सामना हे उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा: Arshdeep Singh : महिनाभरापूर्वीचा व्हिलन आता ठरला सुपरहिरो, एका ओव्हरमध्ये बदललं चित्र

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा केल्या. केशव महाराज यांनी सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी अर्शदीप सिंगने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग 16.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात केला. सूर्यकुमार 33 चेंडूत 50 आणि केएल राहुल 56 चेंडूत 51 धावांवर नाबाद राहिला. राहुलने षटकार मारून सामना संपवला. 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने तबरेज शम्सीला षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढील सामना 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.