Suryakumar Yadav : 'सिक्सर किंग' सूर्यावर विक्रमांचा पाऊस; पाकिस्तानी खेळाडूला टाकले मागे

सूर्याने एकाच खेळीत रचले अनेक विश्वविक्रम
Suryakumar Yadav
Suryakumar Yadavsakal

Suryakumar Yadav IND VS SA : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची या वर्षी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी सुरूच आहे. तिरुवनंतपुरम येथे बुधवार 28 सप्टेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने एक मोठा विश्वविक्रम केला. षटकारांचा पाऊस पाडत त्याने यावर्षी T20I क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे.

Suryakumar Yadav
IND vs SA : अर्शदीप-दीपकची घातक गोलंदाजी, सुर्याची विक्रमी कामगिरी, विजयाची 5 प्रमुख कारणे

सूर्यकुमार यादव एका वर्षात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने यावेळीस पाकिस्तान संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. ज्याने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 42 षटकार ठोकले होते. 2021 मध्येच न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने T20I क्रिकेटमध्ये 41 षटकार ठोकले होते. पण आता सूर्याने त्याला मागे टाकले आहे.

Suryakumar Yadav
Arshdeep Singh : महिनाभरापूर्वीचा व्हिलन आता ठरला सुपरहिरो, एका ओव्हरमध्ये बदललं चित्र

सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 45 षटकार मारले आहेत. त्याने यावर्षी 21 सामने खेळले आहेत. या वर्षातील सर्वात आक्रमक आणि धडाकेबाज T20I फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून फॉर्ममधून बाहेर गेला नाही.

T20I क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार

  • 45 - सूर्यकुमार यादव (2022)*

  • 42 - मोहम्मद रिझवान (2021)

  • 41 - मार्टिन गप्टिल (2021)

  • 37 - एविन लुईस (2021)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com