Ind Vs Afg : संजू सॅमसनची एन्ट्री पक्की; तिसऱ्या टी-20 सामन्यात संघात होणार बदल, कोण जाणार बाहेर?

India Vs Afghanistan 2nd T20 Playing xi News :
India Vs Afghanistan 2nd T20 Playing xi News marathi
India Vs Afghanistan 2nd T20 Playing xi News marathisakal

India vs Afghanistan 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक-दोन बदल दिसू शकतात.

India Vs Afghanistan 2nd T20 Playing xi News marathi
तिसऱ्या टी-20 सामन्याआधी संघाला मोठा धक्का! मालिकेच्या मध्येच कर्णधार बाहेर, मोठे कारण आले समोर

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसनचाही टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनचा अद्याप समावेश झालेला नाही. त्याच्या जागी दुसरा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला दोन सामन्यांमध्ये संधी देण्यात आली. आता जितेश शर्माला विश्रांती देऊन तिसऱ्या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनचा समावेश होण्याची शक्यता आहे.

India Vs Afghanistan 2nd T20 Playing xi News marathi
Sachin Tendulkar News : सचिन तेंडुलकर डीपफेक प्रकरणात नवा ट्विस्ट! केंद्रीय सरकारने घेतली मोठी ॲक्शन

या मालिकेतील वेगवान गोलंदाज आवेश खानचाही संघात समावेश करण्यात आला आहे. आवेश खानलाही पहिल्या दोन टी-20 सामन्यांमधून वगळण्यात आले होते. आता तिसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.

याआधी आवेश खानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या वनडे आणि टी-20 संघात समावेश करण्यात आला होता. आवेश खानने टीम इंडियासाठी आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 18 विकेट आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com