Sachin Tendulkar News : सचिन तेंडुलकर डीपफेक प्रकरणात नवा ट्विस्ट! केंद्रीय सरकारने घेतली मोठी ॲक्शन

Sachin Tendulkar Deepfake Video News : सचिन तेंडुलकर डीपफेक प्रकरणात नवा ट्विस्ट!
Sachin Tendulkar Deepfake Video News Marathi
Sachin Tendulkar Deepfake Video News Marathisakal

Sachin Tendulkar Deepfake Video Controversy : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सोमवारी त्याच्या X अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर चांगलाच संतापलेला दिसत आहे.

वास्तविक, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा राग त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ गेमिंग अॅपद्वारे वापरण्यात आल्यानंतर दिसून आला. गेमिंग अॅपद्वारे सचिनचा व्हिडिओ खोटी जाहिरात म्हणून वापरण्यात आला आणि या व्हिडिओमध्ये सचिनचा आवाज म्यूट करण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्रीय सरकारने याप्रकरणी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sachin Tendulkar Deepfake Video News Marathi
MS Dhoni Ram Mandir : धोनी देखील अयोध्येला जाणार...? राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं पोहचलं आमंत्रण

डीपफेक व्हिडिओवर सचिन तेंडुलकरने संताप व्यक्त केल्यानंतर आता केंद्रीय सरकार त्यावर कारवाई करणार आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी हा व्हिडिओ समोर आणल्यानंतर सचिन तेंडुलकरचे आभार मानले. अशा डीपफेक आणि चुकीची माहिती देणारे व्हिडिओ भारतीय वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण करतात.

या प्लॅटफॉर्मसाठी केंद्राने जारी केलेल्या सल्ल्याचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे कोणी केले नाही तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही लवकरच या प्लॅटफॉर्मसाठी IT नियमांतर्गत कठोर नियमांची अधिसूचना जारी करू.

सचिन तेंडुलकर बर्‍याचदा शांत स्वभावाचा दिसतो, पण सोमवारी माजी क्रिकेटपटूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो थोडासा रागात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सचिन लोकांना त्याच्या डीपफेक व्हिडिओंपासून सावध राहण्यास सांगत आहे.

व्हिडिओमध्ये सचिन आपला आवाज म्यूट करून गेमिंग अॅप Batting Maestros चे प्रमोशन करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून सचिन चांगलाच संतापला. यानंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या चाहत्यांना अशा व्हिडिओ आणि गेमिंग अॅप्सविरोधात तक्रार करण्यास सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com