IND VS AUS 2nd T20 : सामना रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs australia 2nd t20 nagpur

IND VS AUS 2nd T20 : सामना रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का?

India vs Australia 2nd T20 Nagpur : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात पावसाचा धोका आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी या परिस्थितीबद्दल नाराज आहेत. 45,000 क्षमतेच्या स्टेडियमवरील सामन्याची तिकिटे आधीच विकली गेली आहेत.

हेही वाचा: IND vs AUS 2nd T20 Live : मैदान ओलं; पंच अजूनही सामना खेळवण्याबाबत साशंक

नागपूरमध्ये गेले काही दिवस पाऊस पडत असल्याने मैदान ओले झाले आहे. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. दरम्यान ओल्या मैदानामुळे नाणेफेकीस उशीर होत आहे. सामन्यात एकही चेंडू न पडल्यास प्रेक्षकांचे पैसे परत मिळणार आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पाच कोटींचा विमा काढला आहे.

काल सकाळच्या पावसामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोघांना दुपार आणि संध्याकाळी त्यांचे नियोजित सराव सत्र रद्द करावे लागले. संघ हॉटेलच्या जिम सेशनला उपस्थित राहिल्यानंतर खेळाडूंना स्टेडियममध्ये जाता आले नाही.

हेही वाचा: IPL 2023 Auction :डिसेंबरमध्ये ठरणार जडेजा CSK की GT चा; BCCI लिलावाचं करतंय प्लॅनिंग?

नागपूर मध्ये तीन वर्षानंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे चाहते ऑनलाईन तिकीट बुक करून सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिले आहे. शहरापासून स्टेडियम 20 किमीपेक्षा जास्त अंतरावर आहे. व्हीसीएला स्वतःची वाहने घेऊन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्याबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत.

Web Title: India Vs Australia 2nd T20 Nagpur Rain If Match Not Played Can Get Viewers Refund Ticket Amount Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..