IND vs AUS 3rd T20I : भारत मालिका विजयासह इतिहास रचण्यासही सज्ज; सर्वात यशस्वी टी 20 संघ होण्याची संधी

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 संघांच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जीत
ind vs aus 3rd t20
ind vs aus 3rd t20esakal

IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी 20 सामना हा गुवाहाटी येथे आज (दि.28) होत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली आहे. आजचा तिसरा सामना जिंकून भारत मालिका आपल्या खिशात टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असून गोलंदाजीत वेगवान गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

ind vs aus 3rd t20
Champions Trophy 2025 : भारत - पाकिस्तान भांडणात तिसऱ्याची उडी... चॅम्पियन्स ट्रॉफी युरोपात होणार?

आजचा सामना जर भारताने जिंकला तर भारतीय संघ (Team India) फक्त मालिकाच खिशात घालणार नाही तर एक ऐतिहासिक कामगिरी देखील करणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 135 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने जिंकले आहेत. आता भारत आपला 136 वा टी 20 सामना जिंकून टी 20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 मालिकेत दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य कांगारूंना चांगलंच जेरीस आणलं आहे.

ind vs aus 3rd t20
Schoolympics 2023 : तिरंदाजीत अखेरच्या दिवशी गोखळीच्या गुरुकुल विद्यामंदीरने पटकावले पाच पदक

भारताने मालिकेतील पहिला सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 44 धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत 2 - 0 अशी आघाडी मिळवली. भारताने या सामन्यात विक्रमी 235 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताने दोन्ही सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

भारताकडून यशस्वी जैसवाल, इशान किशन, रिंकू सिंह आणि सूर्यकुमार यादव यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. आज तिसऱ्या टी 20 सामन्यात देखील भारतीय संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com