India vs Australia 5th T20 Live Match 2025
esakal
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील अखेरचा सामना आज होत असून, ही मालिका जिंकणे आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आत्मविश्वास वाढवण्यास महत्त्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियातील या मालिकेत भारतीय संघ २-१ असे आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने गेल्या १७ वर्षांत टी-२० मालिका गमावलेली नाही. आजच्या सामन्याचा निकाल विरोधात गेला तरी अपराजित राहण्याची मालिका कायम राहील, परंतु सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाचे लक्ष्य विजयापेक्षा कमी नसेल.