कमिन्सने लांबविला भारताचा विजय; दोन पाऊले दूर

शनिवार, 29 डिसेंबर 2018

मेलबर्न क्रिकेट मैदानावर दिवसभर पावसाळी हवा होती तरी खेळात व्यत्यय आला नाही. कसोटी मालिकेत आघाडी घेण्याकरता भारतीय गोलंदाज मेलबर्न कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जिवाचे रान करताना बघायला मिळाले. 8 बाद 106 धावांवर विराट कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित करून विजयाकरता 399 धावांचे खडतर आव्हान ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर उभे केले.

मेलबर्न : पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने एक तास खिंड लढवल्याने चौथ्या दिवशीचा पराभव टळला. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अडखळता प्रवास करताना 8 बाद 257 ची मजल मारली. थोडक्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयापासून फक्त दोन पावले दूर आहे.

मेलबर्न क्रिकेट मैदानावर दिवसभर पावसाळी हवा होती तरी खेळात व्यत्यय आला नाही. कसोटी मालिकेत आघाडी घेण्याकरता भारतीय गोलंदाज मेलबर्न कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जिवाचे रान करताना बघायला मिळाले. 8 बाद 106 धावांवर विराट कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित करून विजयाकरता 399 धावांचे खडतर आव्हान ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर उभे केले.

चौथ्या दिवशी विराट कोहलीने भारताची फलंदाजी पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. मयांक अगरवालने नॅथन लायनला दोन उत्तुंग षटकार मारून इरादे स्पष्ट केले. रिषभ पंतही खराब चेंडूंना चांगले जोरकस फटके मारत होता. पॅट कमिन्सच्या अचानक खाली राहिलेल्या चेंडूने मयांक अगरवालचा घात केला. मयांक अगरवालने दुसर्‍या डावात 42 धावांची खूप चांगली खेळी करून छाप पाडली. पहिल्यांदा रवींद्र जडेजा आणि मग रिषभ पंत बाद झाल्यावर विराट कोहलीने डाव घोषित केला. पॅट कमिन्सने 27 धावांमधे 6 भारतीय फलंदाजांना बाद केले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा -
भारत ऐतिहासिक विजयासाठी आतूर; दोन पावले दूर

Web Title: India vs Australia melbourne test