IND vs AUS WTC Final Day 1 Rohit Sharma
IND vs AUS WTC Final Day 1 Rohit Sharma esakal

IND vs AUS WTC Final Day 1 : ढगांनी गंडवलं; पहिल्याच दिवशी रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

IND vs AUS WTC Final Day 1 Rohit Sharma : रोहित शर्माने WTC Final मध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर सर्व क्रिकेट चाहचे एकमद खूष झाले होते. ढगाळ वातावरण आणि हिरवी खेळपट्टी पाहून रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी फ्रेश असल्याने पहिल्या तासाभारत चेंडू असमान उसळी घेत होता. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोन सत्रातच गुंडाळणार असे वाटत होते. मात्र कांगारूंनी ट्रॅविस हेडने नाबाद 146 तर स्टीव्ह स्मिथने नाबाद 95 धावा ठोकत कांगारूंना पहिल्या दिवशी 3 बाद 327 धावा केल्या.

मात्र तासभर कांगारूंनी तग धरत भारताला फक्त एका विकेटवर समाधान मानायला लावले. त्यानंतर जसे सूर्यदर्शन झाले कांगारूंनी धावांची गती वाढवण्यास सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेनने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावाची भागीदारी रचली. यानंतर भारताने पाठोपाठ दोन विकेट्स घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र याच्यावर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रविस हेडने चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत पाणी फेरले. हेडने शथकी तर स्मिथने अर्धशतकी खेळी केली. भारताने संघनिवडीपासून ते रणनितीपर्यंत अनेक चुका केल्या. पहिल्याच दिवशी रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

IND vs AUS WTC Final Day 1 Rohit Sharma
Ind vs Aus WTC Final Day 1 : कांगरूंनी दिवसात ठोकल्या 327 धावा! हेडचे शतकी 'हेडेक', स्मिथनही पोहचला शतकाजवळ

वादग्रस्त संघनिवड

भारताने आजच्या सामन्यासाठी चार वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. एकच फिरकीपटूला संघात स्थान देण्यात आल्याने अश्विन आणि जडेजापैकी एकाचीच संघात वर्णी लागणार होती. रोहितने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानवर असलेल्या अश्विनऐवजी आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या रविंद्र जडेजाला संधी दिली. रोहितने रविंद्र जडेजाच्या डावखुऱ्या फलंदाजीवर जास्त लक्ष दिले असावे. कारण जडेजा हा सध्याच्या प्लेईंग 11 मधील एकमेव डावखुरा फलंदाज आहे. मात्र असे करताना रोहित हे विसरला की ऑस्ट्रेलियाच्या संघात तब्बल 5 फलंदाज हे डावखुरे आहेत. त्यांना अश्विन सारख्या कसलेल्या ऑफ स्पिनरने चांगलेच अडचणीत आणले असते.

प्रथम गोलंदाजीचा निर्णय गंडला

रोहित शर्माने ढगाळ वातावरण पाहून, फ्रेश आणि हिरवे गवत असलेली खेळपट्टी पाहून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या एका तासातच हवामानाने आणि खेळपट्टीने देखील नूर बदलला. याबाबतची शंका रोहितने सामन्यापूर्वी एक दिवस आधी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली होती.

मात्र रोहितने सेफ गेम खेळला. जर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता अन् पहिल्याच तासात भारतीय फलंदाजी ढेपाळली असती तर अवघड झाले असते. त्यामुळे रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असावा. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवशी 300 पार धावा ठोकत भारतावर दबाव निर्माण केला.

IND vs AUS WTC Final Day 1 Rohit Sharma
Travis Head WTC Final 2023 : ट्रॅविस हेडने फक्त भारतीय गोलंदाजांना चोपले नाही तर इतिहासही रचला

पहिल्या तासाभरात फायदा उचलण्यात अपयशी

पहिला एक तास चेंडू चांगला स्विंग आणि असमान उसळत होता. मात्र या एका तासात भारताला फक्त उस्मान ख्वाजाला बाद केले. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चेंडू स्विंग होत असतानाही चेंडू पुढे टाकला नाही. शॉर्ट बॉल टाकण्याच्या रणनितीमुळे डेव्हिड वॉर्नरला धावा करण्याची संधी मिळाली. त्याने एक तास खेळून काढला अन् नंतर मार्नससोबत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली.

अखेर ही भागीदारी भारताने पहिल्या सत्राच्या शेवटी शेवटी फोडली. वॉर्नर 60 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात सुरूवातीलाच मोहम्मद शमीने मार्नसचा त्रिफळा उडवून दमदार सुरूवात केली. मात्र तरी देखील भारताला सामन्यावर नियंत्रण ठेवता आले नाही.

बचावात्मक रणनिती

लंचनंतर भारतीय गोलंदाजांनी ट्रॅविस हेडला फटकेबाजी करण्याची मोकळी सूट दिली. हेड हा शॉर्ट बॉलवर अडखळतो हे माहिती असून देखील भारतीय गोलंदाजांनी हेडला त्याच्या बलस्थानावरच गोलंदाजी केली. यामुळे त्याने झपाट्याने धावा करत कांगारूंना त्वरित सावरले. याचवेळी रोहित शर्माने हेडची आक्रमक फलंदाजी पाहून स्लीपमधील खेळाडू सीमारेषेवर पाठवले. यामुळे हेडने आरामात धावा केल्या. दुसऱ्या बाजूने स्मिथने त्याला सावध साथ दिली.

देर कर दी आते आते...

ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडने धडाकेबाज फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी त्याला शॉर्ट बॉल टाकण्यास सुरूवात केली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हेड सेट झाला होता. दुसऱ्या बाजूने स्मिथही धावा करत होता. भारतीय वेगवान गोलंदाज दमले होते.

भारतीय गोलंदाज गेल्या दोन महिन्यापासून सामन्यात फक्त 4 षटके टाकत होते. त्यानंतर आता थेट दिवसात 20 - 20 षटके टाकावी लागत आहेत. त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून स्पष्ट दिसत होते की ते आता दमले आहेत. त्यामुळे त्यांनी जरी बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यात इतका दम दिसत नव्हता.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com