Ind vs Ban Test Series: ODI मालिका संपली! आता सज्ज व्हा टेस्ट क्रिकेटसाठी, जाणून घ्‍या संपूर्ण शेड्यूल अन्...

India vs Bangladesh Test Series
India vs Bangladesh Test Seriessakal

India vs Bangladesh Test Series : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका शनिवारी 10 डिसेंबर रोजी संपली आहे, जी यजमान बांगलादेशने जिंकली. आता उभय देशांमधील कसोटी मालिका लवकरच सुरू होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 अंतर्गत खेळली जाणारी ही दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे आहे. अशा परिस्थितीत ही मालिका खूप महत्त्वाचे आहे तर जाणून घ्या या मालिकेचे वेळापत्रक काय आहे. सामन्यांची वेळ काय असेल आणि तुम्हाला हे सामने कुठे थेट पाहता येतील.

India vs Bangladesh Test Series
Cristiano Ronaldo In Tears : सुपरस्टार रोनाल्डो ढसाढसा रडला! व्हिडिओ व्हायरल

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवार 14 डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे खेळवला जाणार आहे, जो रविवार 18 डिसेंबरपर्यंत चालेल. त्याचवेळी, मालिकेतील दुसरा सामना गुरुवार 22 डिसेंबरपासून सुरू होईल, जो सोमवार 26 डिसेंबरपर्यंत चालेल. दुसरा सामना मीरपूर ढाका येथील शेरे बांगला स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. या स्टेडियममध्ये एकदिवसीय मालिकेतील दोन सामने खेळले गेले, ज्यात भारताचा पराभव झाला होता.

India vs Bangladesh Test Series
Ishan Kishan : 'इशानने हॉटेलच्या रूममध्ये...', द्विशतक ठोकताच कोचचा धक्कादायक खुलासा

बांगलादेश विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) सकाळी 9.00 वाजता सुरू होईल. त्यावेळी लोकलची वेळ सकाळी साडेनऊची असेल. दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक बांगलादेशच्या वेळेनुसार सकाळी 9.00 वाजता होईल, तर भारतात ते सकाळी 8.30 वाजता होईल. भारत आणि बांगलादेशच्या वेळेत फक्त 30 मिनिटांचा फरक आहे.

India vs Bangladesh Test Series
FIFA WC22 : हॅरी केनचा पेनल्टीवर गोल चुकला अन् इंग्लंड बाहेर! फ्रान्स थाटात उपांत्य फेरीत

मीडिया हक्क सध्या भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. अशा परिस्थितीत एकदिवसीय मालिकेप्रमाणे, तुम्हाला सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर कसोटी मालिका थेट पाहता येईल, तर स्मार्टफोनवर तुम्हाला SonyLiv अॅपवर सामन्याचा आनंद घ्यावा लागेल. हिंदी आणि इंग्रजीशिवाय कसोटी सामन्यांची समालोचन इतर अनेक भाषांमध्येही ऐकायला मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com