
Eng vs Ind : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव; रीस टोपलीचा भेदक मारा
England vs India 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 49 षटकांत सर्व विकेट गमावून 246 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 38.5 षटकांत केवळ 146 धावाच करू शकला आणि 100 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह विश्वविजेत्या इंग्लंडने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडकडून रीस टोपलीने 9.5 षटकांत 24 धावांत 6 बळी घेतले.
हेही वाचा: लॉर्ड्सच्या मैदानावर Virat Kohli चा स्वॅग निराळा, VIDEO पाहून चाहते थक्क
इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 10 चेंडू खेळून एकही धाव न घेता बाद झाला. शिखर धवन 26 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत खाते न उघडताच बाद झाला. चांगली सुरुवात केल्यानंतर विराट कोहली 16 धावांवर बाद झाला. 27 धावा करून सूर्यकुमार बोल्ड झाला. हार्दिक पांड्या 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाने 29 आणि मोहम्मद शमीने 23 धावा केल्या.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली. सलामीच्या जोडीने 41 धावांची भागीदारी रचली, पण पहिली विकेट पडल्याने इंग्लंडचा डाव डगमगला. त्याचा निम्मा संघ 102 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. जेसन रॉय (23), जॉनी बेअरस्टो (38), जो रूट (11), कर्णधार जोस बटलर (4), बेन स्टोक्स (21) आणि लियाम लिव्हिंगस्टन (33) लवकरच पॅव्हेलियनमध्ये गेले. यानंतर मोईन अलीने 47 आणि डेव्हिड विलीने 41 धावा करत इंग्लंडची धावसंख्या 246 च्या पार नेली.
हेही वाचा: युझवेंद्र चहलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज
भारताकडून युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 10 षटकांत 47 धावा देत 4 बळी घेतले. त्यांच्याशिवाय हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन तर मोहम्मद आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय फिरकीपटू चहलने लॉर्ड्सवर इतिहास रचला. चहल हा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. ज्याच्या नावावर आता एकदिवसीय सामन्यात लॉर्ड्सवर 4 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.
Web Title: India Vs England 2nd Odi England Win By 100 Runs Level Series 1 1 Ind Vs Eng Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..