esakal | Ind vs Eng : चेन्नईत टीम इंडियाचा लुंगी डान्स; मालिका बरोबरीसह ICC वर्ल्ड टेस्ट रॅंकिगमध्ये सुधारणा
sakal

बोलून बातमी शोधा

 India vs England 2nd Test,  ind win test  series level, ICC WTC Point Table, Ashwin,Axar,Kohli,Joe Root

टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंड संघाचा खेळ चौथ्या दिवशीच खल्लास करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. अश्विनच्या अष्टपैलू खेळाचा संघाला मोठा फायदा झाला. अश्विनने आपल्या फिरकीने इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवले. त्याला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलनं उत्तम साथ दिली.

Ind vs Eng : चेन्नईत टीम इंडियाचा लुंगी डान्स; मालिका बरोबरीसह ICC वर्ल्ड टेस्ट रॅंकिगमध्ये सुधारणा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

India vs England 2nd Test : टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंड संघाचा खेळ चौथ्या दिवशीच खल्लास करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पाहुण्या संघाला टीम इंडियाने 317 धावांनी पराभूत केले. अश्विनच्या अष्टपैलू खेळाचा संघाला मोठा फायदा झाला. अश्विनने आपल्या फिरकीने इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवले. त्याला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलनं उत्तम साथ दिली. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहित शर्मा 161,  अजिंक्य रहाणे (67) आणि पंतच्या नाबाद 58 धाावांच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावातील 329 आणि दुसऱ्या डावातील 286 धावांसह पाहुण्या इंग्लंडसमोर 482 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान त्यांना पेललं नाही. इंग्लंड संघाचा दुसरा डाव 164 धावांत आटोपला. मोईन अलीने 18 सर्वोच्च 43 धावांची खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. दुसऱ्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाली आहे. 

INDvsENG: शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विननं केली 'हवा'; कळलं का भावा!

इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली रॉरी बर्न्सला ईशांतने पहिल्याच षटकात बाद केले. सिब्ले 16, स्टोक्स 18, फोक्स नाबाद 42 आणि ओली पोपच्या 22 धावा वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 134 धावांत आटोपला. अश्विनने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. ईशांत-अक्षरने प्रत्येकी दोन-दोन तर सिराजने एक विकेट घेतली. 

दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पण कर्णधार कोहली 62 आणि अश्विन 106 धावा यांच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात 286 धावा करत पाहुण्यांसमोर 482 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडने तिसऱ्या दिवशीच 3 विकेट गमावल्या होत्या.   

loading image