
भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभव स्वीकारल्यानंतर दिमाखात कमबॅक केले.
पंतचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरने अक्षर पटेलच्या साथीनं केलेली 165 धावांची भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 365 धावा केल्या आहेत. भारतीय संघाने 160 धावांची आघाडी घेऊन इंग्लंडसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे केले आहे. 6 बाद 146 असे संकटात सापडलेल्या भारताला चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 294 अशी मजल मारता आली आणि 89 धावांनी आघाडीही मिळाली होती. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने तिसऱ्या दिवशी 7 बाद 294 धावांवरुन भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली.
"हमारे इश्क से देश को प्यार हुआ" : गावसकर
वॉशिंग्टन सुंदर 96 धावांवर खेळत असताना अक्षर पटेलच्या रुपात टीम इंडियाला आठवा धक्का बसला. अक्षर पटेल 43 धावांवर रन आउट झाला. त्यानंतर बेन स्टोक्सने ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजला एकाच षटकात शून्यावर माघारी धाडत भारतीय संघाचा डाव 365 धावांत आटोपला. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवातही अडखळत केली आहे.
अश्विनने एकाच षटकात दोघांना माघारी धाडले. सलामीवीर क्राउली याला त्याने रहाणे करवी 5 धावांवर माघारी धाडले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या जॉनी बेयरस्ट्रोला अश्विनने खातेही उघडू दिले नाही. अश्विन हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर असताना इंग्लंड कर्णधार ज्यो रुट मैदानात आला. पहिल्याच चेंडूवर खाते उघडत त्याने अश्विनची हॅटट्रिक टाळली. पण इंग्लंडचा पराभव टाळण्यासाठी त्याला मोठी खेळी करावी लागणार आहे. अक्षर पटेलच्या गोलंदाजी सिब्लेही बाद झाला आहे. बेन स्टोक्सलाही अक्षरने अवघ्या 2 धावांवर तंबूत धाडले आहे.
INDvsENG : आपल्याच 3 गड्यांनी वॉशिंग्टनला नाइंटीमध्ये नर्व्हस केलं
भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभव स्वीकारल्यानंतर दिमाखात कमबॅक केले. चेन्नईच्या मैदानातील दुसरा कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधली. अहमदाबादच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला दोन दिवसांतच इंडियाने पराभव केला.