esakal | बुमराह अँड कंपनी पाकिस्तानच्या त्या माऱ्याची बरोबरी करेल का?
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

बुमराह अँड कंपनी पाकिस्तानच्या त्या माऱ्याची बरोबरी करेल का?

sakal_logo
By
सुशांत जाधव

नव्वदीच्या दशकात पाकिस्तानी क्रिकेट संघातील गोलंदाजांनी क्रिकेटच्या मैदानात आपली दहशत निर्माण केली होती. वासीम आक्रम, वकार युनिस आणि फिरकीपटूंमध्ये मुश्ताक अली आणि सक्लेन मुश्ताक यांनी पाकिस्तानसाठी मॅच विनिंग कामगिरी करुन दाखवलीये. परदेशी खेळपट्टीवर फलंदाजांना नाचवण्याची जी किमया नव्वदीच्या दशकात पाकिस्तानने करुन दाखवली अगदी तोच तोरा दोन दशकानंतर आता भारतीय गोलंदाजीच्या ताफ्यात दिसून येत आहे. भारतीय गोलंदाजी पाकिस्तानच्या त्या माऱ्याशी बरोबरी करेल का? अशी चर्चाही रंगत आहे.

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अशक्यप्राय वाटणाऱ्या सामन्याला कलाटणी दिली. जलदगती गोलंदाजांचा भेदक मारा आणि त्यांना जडेजाच्या रुपात मिळाली सुरेख साथ याच्या जोरावर टीम इंडियाने ओव्हलचे मैदान गाजवले. 25 वर्षांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाने वासीम आक्रम यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सच्या मैदानातील विजयासह इंग्लंडला 2-0 असे पराभूत केले होते.

हेही वाचा: T20 World Cup: 'टीम इंडिया'च्या घोषणेआधी 'या' खेळाडूची चर्चा

आक्रम यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा सामना करणारा त्यावेळचा इंग्लंडचा संघ कसोटी वाचवण्यासाठी खेळताना पाहायला मिळाले होते. दुसऱ्या सत्रापर्यंत केवळ एक विकेट गमावलेल्या इंग्लंडच्या अखेरच्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन दशकांपूर्वी पाकिस्तान संघाने इंग्लंडचे जी अवस्था केली होती तशीच काहीशी अवस्था भारतीय गोलंदाजांनी ज्यो रुटच्या संघाची ओव्हलच्या मैदानात केली.

सामन्यानंतर विराट कोहलीने बुमराहसंदर्भातील खास किस्सा शेअर केला होता. ज्यावेळी चेंडू रिव्हर्स स्विंग होताना दिसला त्यावेळी बुमराह स्वत: माझ्याकडे आला. त्याने गोलंदाजी मागून घेतली आणि त्यानंतर सामन्याला कलाटणीच मिळाली. 25 वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानच्या वकार युनिसने करुन दाखवले होते अगदी तोच तोरा बुमराहच्या गोलंदाजीत पाहायला मिळाले. बुमराहने ओली पोप आणि जॉनी बेयस्ट्रोची घेतलेली विकेट ही सामन्याच्या टर्निंग पॉइंट ठरली.

हेही वाचा: Video: कैफने केला 'नागिन डान्स'; सेहवागला दिलेला शब्द पाळला!

1996 मध्ये सक्लेन मुश्ताकच्या फिरकीत जी जादू दिसली होती तिच झलक जड्डूच्या गोलंदाजीत पाहायला मिळाले. टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी तर भारतीय गोलंदाजीची तुलना थेट कॅरेबियन संघासोबत केल्याचे पाहायला मिळाले. 1970-80 च्या दशकात जी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा जो दरारा होता अगदी तो तोरा टीम इंडियाच्या गोलंदाजीत दिसतो, असे ते म्हणाले आहेत.

इंग्लंडचा कर्णधार ज्योरुटही भारतीय गोलंदाजीनं प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले. बुमराहने सामना वळवला असे सांगणाऱ्या रुटने उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर यांच्या गोलंदाजीलाही दाद दिली. भारतीय गोलंदाजी ताफ्याची कोणत्याही दुसऱ्या काळातील गोलंदाजी आक्रमणाशी तुलना करता येणार नाही. पण सध्याच्या घडीला टीम इंडियात एक हिरो नाही तर अनेक हिरो असल्याचे तो म्हणाला होता.

loading image
go to top