esakal | IND vs ENG : अँडरसनची नॉट आउट सेंच्युरी! सचिनलाही टाकलं मागे
sakal

बोलून बातमी शोधा

James Anderson

IND vs ENG : अँडरसनची नॉट आउट सेंच्युरी! सचिनलाही टाकलं मागे

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India, 4th Test : इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson)आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे ओळखला जातो. पण लंडनच्या चौथ्या कसोटीत त्याने बॅटिंग करताना खास विक्रम आपल्या नावे केलाय. नाणेफेक जिंकून इंग्लंडने पहिल्यांदा गोलंदाजी केली आणि भारतीय संघाचा पहिला डाव 191 धावांत आटोपला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 290 धावांत आटोपला. क्रिस वोक्सच्या रुपात इंग्लंडची शेवटची विकेट पडली. दुसऱ्या बाजूला जेम्स अँडरसन एका धावेवर नाबाद राहिला.

चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात नाबाद एक धाव करणाऱ्या अँडरसनच्या नावे खास शतकी विक्रमाची नोंद झाली. 100 वेळा नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. या यादीत त्याच्या जवळपासही कोणी दिसत नाही. सर्वाधिकवेळा नाबाद राहणाऱ्या खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्टनी वॉल्श यांचा समावेश आहे. या दोन दिग्गजांतील अंतर तब्बल 39 एवढे आहे. कर्टनी वॉल्श यांनी 61 वेळा नाबाद तंबूत परतले आहेत.

हेही वाचा: Paralympics : मनिष नरवालचा सुवर्ण वेध; सिंहराजलाही रौप्य

सर्वाधिक नाबाद राहणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गोलंदाजच अधिक आहेत. अँडरसन आणि वॉल्श यांच्याशिवाय मुथय्या मुरलीधरन, क्रिस मार्टिन, ग्लेन मेग्रा आणि शिवनारायण चंद्रपॉल यांचा यात समावेश आहे. हा खास विक्रम आपल्या नावे करण्यापूर्वी अँडरसनने चौथ्या कसोटी सामन्यात विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मागे टाकला होता.

हेही वाचा: IND vs ENG : टीम इंडिया पिछाडीवरुन धमाका करण्यात माहिर; पण...

घरच्या मैदानात सर्वाधिक सामने खेळण्याचा पराक्रम अँडरसनने आपल्यान नावे केला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अँडरसनसाठी घरच्या मैदानातील 95 वा सामना आहे. तेंडुलकरने घरच्या मैदानात 94 कसोटी सामने खेळले आहेत. या विक्रमाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानात 92 कसोटी सामने खेळले आहेत.

loading image
go to top