esakal | IND vs ENG: चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, जसप्रीत बुमराहची माघार

बोलून बातमी शोधा

jasprit bumrah.jpg}

कोरोना काळात टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून बुमराह सातत्याने क्रिकेट खेळत आहे.

IND vs ENG: चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, जसप्रीत बुमराहची माघार
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली- टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी मोठा झटका बसला आहे. टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे या कसोटीतून माघार घेतली आहे. बुमराह या मालिकेतील पहिल्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळला होता. तर दुसऱ्या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली होती. भारत सध्या या मालिकेत 2-1 ने पुढे आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताची मोठी शक्यता आहे. भारताला आता चौथ्या सामन्यात विजय किंवा ड्रॉ करण्याची गरज आहे. 

बीसीसीआयने बुमराहच्या माघार घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरोधात चौथ्या कसोटीपूर्वी मंडळाला विनंती केली होती. वैयक्तिक कारणामुळे संघनिवडीत माझा विचार करु नये, अशी विनंती त्याने केली होती. दरम्यान, कोरोना काळात टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून बुमराह सातत्याने क्रिकेट खेळत आहे. त्याने त्याआधी यूएईमध्ये आयपीएल 2020 मध्ये भाग घेतला होता. या मालिकेचे मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जेतेपद पटकावले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिकेतही तो सहभागी झाला होता. 

हेही वाचा- IND vs ENG: ऐ बापू थारी बॉलिंग...कॅप्टन विराटने केलं अक्षर पटेलचं कौतुक, पाहा VIDEO

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी या खेळाडूंमधून संघ निवडला जाणार आहे. 
- रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, विराट कोहली, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, हार्दिक पांड़या, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.