esakal | IND vs ENG: ऐ बापू थारी बॉलिंग...कॅप्टन विराटने केलं अक्षर पटेलचं कौतुक, पाहा Video
sakal

बोलून बातमी शोधा

virat main.jpg

कोहलीचा गुजराती अंदाज ऐकून हार्दिक आणि अक्षर पटेल आश्चर्यचकित झाले आणि त्यांना हसू ही आवरता आले नाही.

IND vs ENG: ऐ बापू थारी बॉलिंग...कॅप्टन विराटने केलं अक्षर पटेलचं कौतुक, पाहा Video

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आणि 10 विकेटने इंग्लंडचा पराभव करुन मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्यात यश मिळवले. तिसऱ्या कसोटी टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी केली. विशेषतः अक्षर पटेलने सामन्यात 11 विकेट घेतल्या. अक्षर पटेलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामन्यानंतर हार्दिक पांड्या अक्षर पटेलची मुलाखत घेत होता. त्याचवेळी मध्येच कर्णधार विराट कोहली आला आणि माइक घेऊन गुजरातीमध्ये अक्षरचे कौतुक केले. कोहलीने माइक घेऊन ए बापू थारी बोलिंग कमाल छे, असे म्हटले. 

कोहलीचा गुजराती अंदाज ऐकून हार्दिक आणि अक्षर पटेल आश्चर्यचकित झाले आणि त्यांना हसू ही आवरता आले नाही. विराटने गुजराती भाषेत संवाद साधल्याने त्यांना मोठा आनंद झाला. बीसीसीआयने कॅप्टन कोहलीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओला प्रचंड लाइक्स मिळाले आहेत. कोहलीच्या गुजराती संभाषणानंतर हार्दिकनेही फिरकी घेतली आणि कोहली नव्याने गुजराती शिकल्याचे म्हटले.

हेही वाचा- INDvsENG 3rd Test : मोठ्या मैदानात टीम इंडियाचा थाट; ICC टेस्ट चॅम्पियनशिपमधून इंग्लंड आउट

अहमदाबादमध्ये कसोटी दोनच दिवसांत संपुष्टात आली. त्यानंतर पिचवरुन माजी इंग्लिश क्रिकेटपटू हैराण झाले. त्यांनी टि्वट करुन अहमदाबादच्या पिचवर टीका केली आहे. तर भारताच्या युवराज सिंगनेही टि्वट करत पिचवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, तिसरी कसोटी जिंकल्यानंतर विराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला. कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने आपल्याच देशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने आतापर्यंत 22 कसोटी सामने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने 21 कसोटी जिंकले होते. मालिकेतील अखेरचा कसोटी सामनाही नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाईल. मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडसाठी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खूप महत्त्वाचा मानला आहे. 

हेही वाचा- IPL लिलावात कोणत्याच टीमनं घेतलं नाही, आता 15 वर्षांनंतर श्रीसंतने केला कारनामा

loading image