के एल राहुलच्या दुखापतीत वाढ? इंग्लंडविरुद्ध कसोटी- टी20 ला मुकणार

राहुलच्या दुखापतीबाबत आजून एक मोठ्या बातम्या
KL-Rahul
KL-Rahul Sakal

KL Rahul :दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती, मात्र दुखापतीमुळे तो यापुढे मालिकेचा भाग होता आले नाही. केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी यष्टीरक्षक ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करत आहे. (india vs england kl rahul doubtful for edgbaston test india team)

KL-Rahul
...झाला एकदाचा OUT, 4 मॅचनंतर साऊथ अफ्रिकेच्या फिनशरला बाद करण्यात यश

टीम इंडिया सध्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. राहुलच्या दुखापतीबाबत आजून एक मोठ्या बातम्या समोर येत आहेत. राहुलची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. अशा स्थितीत तो इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून होणाऱ्या एकमेव कसोटीतून बाहेर राहू शकतो. याशिवाय एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतही खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे.

राहुल कधी मैदानात उतरणार हे स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वीच तो एनसीएमध्ये गेला आहे. राहुलची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. इंग्लंड मालिकेतील त्याचे खेळणे संशयास्पद असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहे. भारतीय संघाचा पहिला गट १६ जूनला इंग्लंडला रवाना होणार असल्याची माहिती आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यासह दुसरा गट 20 जूनला जाणार आहे. ते सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळत आहेत.

राहुलच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामी देतील. मात्र संघ व्यवस्थापनाकडून मागणी आल्यास मयंक अग्रवालचा संघात समावेश केला जाऊ शकतो. कोरोनामुळे गेल्या वर्षी कसोटी मालिका पूर्ण होऊ शकली नाही. टीम इंडिया सध्या मालिकेत २-१ ने पुढे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com