Rishabh Pant suffers finger injury on Day 1 of Lords Test : लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला दुखापत झाली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ही दुखापत गंभीर नसावी, अशी प्रार्थना दोन्ही संघातील खेळाडू करत आहेत. अशातच आता त्यांच्या दुखापतीसंदर्भातील अपडेट समोर आलं आहे.