
IND vs ENG: पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडचे धक्कादायक विधान
England Vs India : एजबॅस्टन कसोटीत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडच्या जो रूटने नाबाद 142 धावा तर जॉनी बेअरस्टोने नाबाद 114 धावा करत इंग्लंडला पाचव्या कसोटीत विजय मिळवून दिला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 269 धावांची भागीदारी रचली. या विजयामुळे इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली. (rahul dravid coach big statement after match)
हेही वाचा: Cricket Record | भारत - इंग्लंड सामन्यात रेकॉर्ड अन् माईलस्टोनचा 'पाऊस'
भारतीय संघाचा हा सर्वात वाईट पराभव होता. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले की, कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात वारंवार फलंदाजीत अपयश येणे ही चिंतेची बाब आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय निवडकर्त्यांसोबत बैठक घेणार आहे. द्रविडच्या देखरेखीखाली भारतीय संघ परदेशात गेलेले तीन कसोटी सामने हरले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि आता बर्मिंगहॅममध्ये दोन कसोटी सामन्यांमध्ये 378 धावांचे मोठे लक्ष्य राखण्यात संघाला अपयश आले होते.
हेही वाचा: P V Sindhu | बॅडमिंटन आशिया तांत्रिक समिती संचालकांनी सिंधूची मागितली माफी
बर्मिंगहॅममध्ये पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड दोन दिवसांत सुरू होणाऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा संदर्भ देत म्हणाला की, 'इतके क्रिकेट आहे की आमच्याकडे विचार करायला वेळ नाही.' या कसोटी सामन्याचा आणि कामगिरीचा नक्कीच विचार केला जाईल. प्रत्येक सामना हा आमच्यासाठी धडा असतो आणि तुम्ही काही ना काही शिकत राहता. आम्ही कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात चांगली फलंदाजी का करू शकत नाही आणि चौथ्या डावात 10 विकेट का काढू शकलो नाही याचा विचार करायला हवा.
भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 23) मध्ये आणखी सहा सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने उपखंडात आहेत. त्यामुळे सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या निवड समितीचे अध्यक्ष यांच्यासोबत बसून त्रुटींचे विश्लेषण करण्याची योजना आखत आहे असे द्रविड म्हणाले.
Web Title: India Vs England Test Rahul Dravid Coach Big Statement After Match Ind Vs Eng Sports Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..