P V Sindhu | बॅडमिंटन आशिया तांत्रिक समिती संचालकांनी सिंधूची मागितली माफी

Badminton Asia Technical Committee chairman Chih Shen Chen has apologized P V Sindhu for human error
Badminton Asia Technical Committee chairman Chih Shen Chen has apologized P V Sindhu for human error esakal

नवी दिल्ली : बॅडमिंटन (Badminton) आशिया तांत्रिक समिती संचालक चिह शेन चेन यांनी भारताची दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूची (P.V. Sindhu) माफी मागितली. त्यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या आशिया कप महिला एकेरीच्या सेमी फायनलमध्ये पी. व्ही. सिंधू विरूद्ध एक मानवी चूक झाली होती त्या प्रकरणी माफी (Apologized) मागितली आहे. या सामन्यात पंचांच्या पक्षपाती निर्णयामुळे सिंधूच्या डोळ्यात अश्रू आले होते. हा सामना जपानच्या अकेन यामागुचीविरूद्ध होता. तीन गेमच्या या सामन्यात सिंधूला पराभव सहन करावा लागला होता.

Badminton Asia Technical Committee chairman Chih Shen Chen has apologized P V Sindhu for human error
Cricket Record | भारत - इंग्लंड सामन्यात रेकॉर्ड अन् माईलस्टोनचा 'पाऊस'

बॅडमिंटन आशियाचे (Badminton Asia) अधिकारी म्हणाले की, 'दुर्दैवाने आता या घडीला कोणताही बदल करता येणार नाही. मात्र ही मानवी चूक परत होणार नाही यासाठी योग्य ती पावले उचलत आहोत. आम्ही तुला (सिंधू) यामुळे जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल माफी मागतो. आपण हे मानतो की हा एक खेळाचा भाग आहे हे स्विकारून आपण पुढे जातो.'

ज्यावेळी पंचांनी (Unfair Umpiring) ही चूक केली त्यावेळी सिंधू ही दुसऱ्या गेममध्ये 14-11 ने आघाडीवर होती. तिने पहिला गेम देखील जिंकला होता. यावेळी देखील पंचांनी तिला सर्व्ह करताना जास्त वेळ घेते म्हणून एका गुणाची पेनाल्टी लावली होती. मात्र त्या घटनेनंतर सिंधूचे लक्ष विचलित झाले आणि तिने सामना 21 - 13, 19 - 21, 16 - 21 असा गमावला.

Badminton Asia Technical Committee chairman Chih Shen Chen has apologized P V Sindhu for human error
Jasprit Bumrah | मालिका विजयाची संधी हुकल्यानंतर बुमराहने फलंदाजीवर ठेवले बोट

त्यावेळी सिंधूने प्रतिक्रिया दिली होती की, 'पंचांनी मला तू खूप वेळ घेतेस असे सांगितले मात्र प्रतिस्पर्धी खेळाडू तयार नव्हती. तरी देखील पंचांनी अचानक तिला एक गुण देऊन टाकला हे खूप अन्यायकारक होते. मला असे वाटते की त्याच करणामुळे मी हरले.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com