IND vs HK Asia Cup 2022 : नवख्या हाँगकाँग संघाविरुद्ध चुका सुधारण्याची रोहितला संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Hong Kong Asia Cup 2022

IND vs HK : नवख्या हाँगकाँग संघाविरुद्ध चुका सुधारण्याची रोहितला संधी

India vs Hong Kong Asia Cup 2022 : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला हरवून भारतीय संघाने शानदार सलामी दिली, असली तरी अनेक बाबीत सुधारणा करण्याची गरज आहे. आज हाँगकाँग या नवख्या संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताचे वर्चस्व निश्चितच आहे; पण हा सामन्यतून चुका सुधारण्याची संधी भारताला साधावी लागणार आहे. कारण या लढतीनंतर रविवारी पुन्हा पाकिस्तानविरुद्ध खेळणे अपेक्षीत आहे.

हाँगकाँग संघाची यादी बघितली, तर बहुतांशी खेळाडू अनिवासी भारतीय किंवा पाकिस्तानी आहेत, हे लगेच समजते. क्रिकेट खेळण्याच्या उत्साहाला योग्य मार्गदर्शन लाभलेला, असा हा संघ आहे. कप्तान निजाकत खान समोर आपल्या खेळाडूंना भारतीय संघासमोर उभे करण्याचे आव्हान खुणावत असणार. हाँगकाँग संघ भारतीय संघाला लढत देण्यासाठी धडपडणारी आहे, तर भारतीय संघ पहिल्या सामन्यात झालेल्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा: IND vs HK : हाँगकाँग विरुद्ध भारताची प्लेइंग-11; रोहित युवा खेळाडूंना देईल संधी!

पाकिस्तानसमोरच्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना अपेक्षित यश मिळाले नाही आणि सलामीच्या जोडीला सूर गवसला नाही. दुबई स्टेडियमवरच्या खेळपट्टीचा खरा अंदाज फलंदाजांना आला, असे वाटले तरी नाही. पुढच्या टप्प्यात भारतीय संघाला आशिया खंडातील बाकीच्या चांगल्या संघांसमोर दोन हात करायचे आहेत, त्याचा विचार करता सुधारणा गरजेची आहे.

भारतीय संघ दुसरीच सामन्यात संघात बदल करेल, असे वाटत नाही. रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि विराट कोहली फलंदाजीची भूक भागवून घ्यायला आणि लय शोधायला मैदानात उतरतील.

हेही वाचा: Hardik Pandya : अक्रम म्हणतो, माझ्या दृष्टीने 'हा' आहे जगातील सर्वात उत्कृष्ट अष्टपैलू

षटके वेळेत संपवावी लागणार

पाकविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे अखेरच्या तीन षटकांत चारच क्षेत्ररक्षक सीमारेषेवर ठेवावी लागली होती. त्याचा फारसा फटका बसला नव्हता; परंतु पुढच्या सामन्यात असे पुन्हा घडू नये, यासाठी भारतीयांना वेळेत षटके पूर्ण करायचा सराव हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातून करता येईल.

Web Title: India Vs Hong Kong Asia Cup 2022 Virat Kohli Rohit Sharma Kl Rahul Hardik Pandya Ind Vs Hk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..