
राजगीर (बिहार) : यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाला गतविजेत्या दक्षिण कोरियन संघावर विजय मिळवता आला नाही. मनदीप सिंगने अखेरच्या सत्रात केलेल्या गोलमुळे भारतीय हॉकी संघाला आशियाई करंडकातील ‘सुपर फोर’ फेरीतील पहिल्या लढतीत दक्षिण कोरियाविरुद्ध २-२ अशी बरोबरी करता आली. आता उद्या (ता. ४) भारतीय हॉकी संघासमोर मलेशियन संघाचे आव्हान असणार आहे.