अय्यर-जाडेजाची बल्ले बल्ले! दिवसाअखेर टीम इंडिया 'फ्रंटफूटवर' | India vs New Zealand 1st Test Day 1 Stumps | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ShreyasIyer And Ravindra Jadeja
अय्यर-जाडेजाची बल्ले बल्ले! दिवसाअखेर टीम इंडिया 'फ्रंटफूटवर'

अय्यर-जाडेजाची बल्ले बल्ले! दिवसाअखेर टीम इंडिया 'फ्रंटफूटवर'

India vs New Zealand, 1st Test At Green Park, Kanpur : कायले जमिसनच्या भेदक माऱ्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या टीम इंडियाला अय्यर-जाडेजा (Shreyas Iyer and Ravindra Jadeja) जोडीनं फ्रंटफूटवर आणले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी श्रेयस अय्यर 136 चेंडूचा सामना करुन 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 75 धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या बाजूला जड्डूने 100 चेंडूचा सामना करत 6 चौकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले होते. दोघेही नाबाद परतल्यामुळे भारतीय संघ 4 बाद 258 धावासह सामन्यात मजबूत स्थितीत पोहचला होता.

तो 28 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 13 धावांची भर घालून माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या चेतेश्वर पुजारासह शुबमन गिलने 61 धावांची भागीदारी रचली. कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकवल्यानंतर जेमिसनने शुबमनला बाद केले. त्याने 93 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावांचे योगदान दिले. साउदीने चेतेश्वर पुजाराच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर जेमिसनने कर्णधार अजिंक्य रहाणेला चालते केले. पुजाराने 88 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेनं 63 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 35 धावांचे योगदान दिले.

हेही वाचा: IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर मुंबईकर क्रिकेटरचीच हवा!

संघाच्या धावफलकावर 145 धावा असताना भारतीय संघाने चार गडी गमावले होते. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि रविंद्र जाडेजाने संघाचा डाव सावरला. दोघांनी संयमी खेळीसर नाबाद शतकी भागीदारी रचत दिवसाअखेर संघाच्या धावफलकावर 258 धावा लावल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा श्रेयस अय्यर शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसऱ्या दिवशी तो खास विक्रम आपल्या नावे नोंदवत शतकाला गवसणी घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे रविंद्र जाडेजालाही कसोटीमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची संधी असेल. त्याच्या नावे 57 कसोटीत एका शतकाची नोंद आहे. दुसऱ्या दिवशी तो कसोटी कारकिर्दीतील शतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला तर भारतीय संघ न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान उभे करु शकतो.

हेही वाचा: CSK ची जय-वीरूची जोडी तुटणार तर धोनी खेळणार तीन हंगाम?

loading image
go to top