IND vs NZ: रोहित-विराटच्या अनुपस्थितीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND VS NZ
IND vs NZ: रोहित-विराटच्या अनुपस्थितीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI

रोहित-विराटच्या अनुपस्थितीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs New Zealand, 1st Test At Green Park, Kanpur : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात रंगणार आहे. कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करताना दिसेल. याशिवाय सलामीवीर रोहित शर्मालाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल दिसणार आहे.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत क्लिन स्विप दिल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील असेल. इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र आता घरच्या मैदानावर टीम इंडियाला टक्कर देणं न्यूझीलंडसमोर अग्नी परीक्षाच असेल.

हेही वाचा: IND vs NZ: सूर्यकुमार की श्रेयस.. चौथ्या नंबरवर कोणाला बॅटिंग?

कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात होणाऱ्या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह ,मोहम्मद शमी आणि लोकेश राहुल या स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडिया नव्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरेल. लोकेश राहुल आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल ही जोडी संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकते.

हेही वाचा: IPL 2022 : २ एप्रिलला खेळला जाईल आयपीएल २०२२चा पहिला सामना!

लोकेश राहुलच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची संघात वर्णी लागली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघात श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित आहे. तो विराट कोहलीच्या जागेवर खेळताना दिसेल. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराचे स्थान निश्चित आहे. यष्टीमागे ऋद्धिमान साहाचे स्थान मिळू शकते. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या फिरकीसह टीम इंडिया पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरेल. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यापैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.

न्यूझीलंड विरुद्ध संभाव्य प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज.

loading image
go to top